जिल्ह्याला कोवॅक्सीन लसीचे 2 हजार 200 डोस प्राप्त

0
335

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याकरिता कोवॅक्सीन लसीचे 2 हजार 200 डोस प्राप्त झाले आहेत. ही कोवॅक्सीन लस ही ज्या नागरिकांना कोवॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतलेला आले त्यांना प्राधान्याने दुसरा दोड देण्याकरिता राखीव आहे. तसेच तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यातील विद्युत सेवा व इंटरनेटसेवा काही ठिकाणी ठप्प झाल्याने कोवीड लसीकरण सत्राचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे. या लसीकरण सत्रामध्ये 45 वर्षावरील नागरीकांना दुसरा डोस दिला जणार आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स यापैकी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनाही यावेळी दुसरा डोस दिला जाणार आहे. तरी ज्या नागरिकांना कोवॅक्सीनचा दुसरा डोस देय आहे त्यांनी उद्या दि. 19 मे 2021 रोजी लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.
सदर लस ही लसीकरण केंद्रावर पुढील प्रमाणे उपलब्ध असणार आहे. कणकवली तालुक्यात कासार्डे येथे 160, देवगड तालुक्यात जामसंडे येथे 160, कुडाळ तालुक्यात माणगाव येथे 160, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी येथे 160, सावंतवाडी तालुक्यात बांदा येथे 160 या प्रमाणे एकूण 800 लसी उपलब्ध असणार आहेत. त्याशिवाय उपजिल्हा रुग्णालय कणकवली आणि जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी येते प्रत्येकी 50 कोविशिल्डच्या लसी उपलब्ध असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.