कणकवली हळवल फाट्यानजीक ट्रकला भीषण अपघात

0
2865

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर हलवळ फाट्या नजिकच्या वळणावर गुजरात ते गोवा येथे कलर वाहतूक करणारा ट्रक पटली झाला. या अपघातात चालक व क्लीनर सुदैवाने बचावले असून दोघेही किरकोळ जखमी झालेत. सदर अपघातग्रस्त ट्रक येथील रस्त्यालगत असलेल्या स्टोल तथा भाजी विक्री स्टॉलला धडक दिल्याने स्टोलचेही नुकसान झाले आहे. तसेच सदर अपघताची घटना आता काहीवेळा पूर्वी ( रा. १० वा.) घडली असून नगरसेवक सुशांत नाईक, शिवसेना उपतालुका प्रमुख राजू राणे, संकेत नाईक, बंड्या नाईक, अक्षय सावंत, महेंद्र पंडित सिद्धेश सावंत, हितेश मालंडकर, सुयोग ताटे, रोहीत राणे, आदिंनी जखमींना मदत केली. त्यानंतर सदर घटनेची माहीती कणकवली पोलिसांना नागरिकांना दिल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागले, स. उप पो. नि. बापू खरात घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, या धोकादायक वळणावर वारंवार अपघात घडतात. दोन महीना पूर्वी ही अपघात झाला होता. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देवून अपघात टाळण्यासाठी उपाय योजना कराव्यात. अशी मागणी नागरिक करत आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.