जिल्ह्यात 1 लाख 61 हजार जणांनी घेतला पहिला डोस

0
208

सिंधुदुर्गनगरी : दि. 30 – वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 61 हजार 698 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
यामध्ये एकूण 9 हजार 668 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 734 जणांनी दुसरा डोस घेतला. 8 हजार 673 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 472 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 70 हजार 537 व्यक्तींनी पहिला डोस तर 22 हजार 797 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 60 हजार 368 नागरिकांनी पहिला डोस तर 7 हजार 176 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस घेतला आहे. असे एकूण 2 लाख 2 हजार 877 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 1 लाख 98 हजार 240 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 55 हजार 180 लसी या कोविशिल्डच्या तर 43 हजार 60 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 60 हजार 471 कोविशिल्ड आणि 42 हजार 406 कोवॅक्सिन असे मिळून 2 लाख 2 हजार 877 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 4 हजार 530 लसी उपलब्ध असून त्यापैकी 3 हजार 250 कोविशिल्डच्या आणि 1 हजार 280 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 2 हजार 310 लसी शिल्लक असून त्यापैकी 2 हजार 160 कोविशिल्ड आणि 150 कोवॅक्सीनच्या शिल्लक आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.