१८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण त्वरित कराव :अर्षद बेग

0
366

सावंतवाडी : दि ३१ : शासनाने १८ ते ४५ वयोगटातील सर्वांचे करोना लसीकरण त्वरित करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष अर्षद बेग यांनी केली आहे. तरुणांचा सहभाग देशाच्या जडणघडणीत फार मोठा आहे,तरुण-तरुणी ज्याच्यावर त्यांचा कुटुंब अवलंबून आहेत अश्या १८ ते ४५ या वयोगटातील तरुण तरुणींचे लसीकरण पुन्हा सुरू करावे.कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मृत पावलेल्या मृतांचे प्रमाण व वयोगट पाहता या मध्ये १८ ते ४५ वयोगटातील संख्या जास्त आहे.लसीकरणाचा पहिला डोस घेणाऱ्या १८ ते ४५ वयोगटातील तरुण-तरुणींची संख्या कमी आहे.भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखले जाते आणि या देशातील तरुण सुरक्षित असायला हवा.१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचा वर्तमानकाळतील व भविष्याकळातील भारताच्या विकासामध्ये सहभाग पाहता लवकरात लवकर लसीकरणावरील स्थगिती उठवून लसीकरणाला पुन्हा सुरुवात करण्यात यावी.अशया मागणीचे पत्र राष्ट्रवादी जिल्हाअध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या कडे करणार असल्याचे अर्षद बेग यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.