पुरवठा अधिकारी प्रमोद केरकर सेवानिवृत्त ; प्रामाणिक अधिकारी म्हणून होती ख्याती

0
615

सावंतवाडी : दि. ३१ : सावंतवाडी तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी प्रमोद केरकर आज ३१ मी रोजी सेवानिवृत्त झाले. सर्वसामान्यांना नेहमी आपला वाटणारा प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. पुरवठा शाखेत काम करताना त्यांनी नेहमीच सामान्यांच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. सामान्य माणसाचं काम पाहिल्या खेपेतचं होण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असत.

अनेक गावात त्यांनी तलाठी म्हणून काम पहिले. त्यानंतर बढतिने अनेक मोठ्या पदावर काम करत त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या पदाला न्याय दिला.

त्यांनी केलेल्या कामांमुळे अनेकदा त्यांचा सन्मानही करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनीही अनेकदा त्यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान केला. आज सेवानिवृत्तीपर झालेल्या कार्यक्रमात अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.