देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय; गेल्या २४ तासात आढळले १,२७,५१० रुग्ण

0
654

नवी दिल्ली : दि. ०१ : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या दुसऱ्या लाटेना देशात हाहाकार माजवला होता. कोरोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. देशात गेल्या २४ तासात १, २७, ५१० रुग्ण आढळले. ही गेल्या ४८ दिवसातील सर्वात कमी संख्या आहे. तसेच मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील घट होतांना दिसत आहेत. गेल्या २४ तासात २,७९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २,५५,२८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील दररोजची आकडेवारी जाहीर करण्यात येते. गेल्या २४ तासांतील कोरोना परिस्थितीबद्दलचे आकडे मंत्रालयाने प्रसिद्ध केले असून, दिलासादायक चित्र दिसत आहे. आतापर्यंत देशात २,८१,७५,०४४ कोरोना रुग्ण आढळले. तर यापैकी २,५९,४७,६२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ३,३१,८९५ रुग्णांचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे. सध्या देशात १८,९५,५२० कोरोना बाधित रुग्ण आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.