विवाहबाह्य संबंधांचा अर्थ महिला चांगली आई नाही, असा होत नाही : हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

0
1134

चंदीगड : दि. ०२ : आपल्या साडे चार वर्षांच्या मुलीच्या ताब्यासाठी दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर निर्णय सुनावताना पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयानं महत्त्वाची टिप्पणी केलीय. पत्नी विवाहबाह्य संबंधांत असल्यानं आपल्या मुलीचा ताबा तिच्या आईकडे देण्यात येऊ नये, असा दावा पतीनं न्यायालयासमोर केला होता. यावर ‘अनैतिक संबंधांचा अर्थ महिला चांगली आई होऊ शकत नाही, असा होत नाही’ अशी टिप्पणी उच्च न्यायालयानं केलीय.

एखादी महिला विवाहबाह्य संबंधात असेल तर याचा अर्थ ती महिला चांगली आई होऊ शकणार नाही, असा लावला जाऊ नये, असं पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयानं म्हटलंय. ‘ द हिंदू मायनाॅॅरिटी अँँड गार्डीयनशीप अॅॅक्ट १९५६’ च्या कलम ६ नुसार, पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी त्यांच्या आईलाच ‘नॅच्युरल गार्डीयन’ मानलं गेलंय, असंही कोर्टानं आपल्या निर्णयात नमूद केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.