कणकवली शहर विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ

0
715


कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत सामान्य जनतेच्या मनातील शहर विकास साधण्यासाठी राजकीय पक्षांना पर्याय म्हणूनअस्तित्वात आलेल्या शहर विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ कणकवलीच्या स्वयंभू मंदिरात करण्यात आला. शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ स्वयंभू मंदिरात करण्यात आला.यावेळी शहर विकास आघाडीचे अध्यक्ष विष्णू राणे, सदा राणे, बबन राणे, रमेश राणे, देऊ राणे, दत्ताराम साटम, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राकेश राणे व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.