शहरातील ‘त्या’ राड्यामागचं कारण काय ?  

0
2904

सावंतवाडी : दि ०४ : सावंतवाडीत आज राडा घडला असून नगरपरिषदच्या उद्यानासमोरील पार्किंगवरून हा वाद झाला. या वादाचा रुपांतर हाणामारीत पोहोचल. उद्यानासमोरील पार्किंगचा जागेत गाड्या पार्क केल्याच्या कारणावरुन हा प्रकार घडला. उद्यानसमोरील जागेत उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांचे पती आपल्या गाड्या पार्क करतात. या गाड्या चूकीच्या पध्दतीने पार्क गेल्या आहेत असे गौरेश कामत यांचं मत आहे. त्यामुळे तेथील  वॉचमनला त्यांनी विचारणा केली. यावेळी त्या वॉचमनने आपल्याला काही माहीत नसल्याच त्यांना सांगितल. या कारणावरून झालेला वाद हा अगदी हाणामारीपर्यंत पोहोचला. उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर यांचे पती प्रसाद कोरगावकर, मुलगा अखिलेश याना मारहाण करण्यात आली. ही घटना  सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कोरगावकर यांच्या घरासमोर घडली. याप्रकरणी कोरगावकर यांची मुलगी ऐश्वर्याने दिलेल्या तक्रारीनुसार गौरेश कामत, अतिक सामंत यांच्यासह अन्य चार ते पाच जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आपण त्या ठिकाणी चुकीच्या पध्दतीने पार्कींग केले जात आहे. याची विचारणा करण्यासाठी गेलो होतो, यावेळी आपल्याला प्रसाद कोरगावकर यांनी मारहाण केल्याने पुढील प्रकार घडला. असल्याचं  गौरेश कामत यांचं म्हणन आहे.  मात्र याबाबत पोलिसांनी आपली तक्रार नोंदवून घेतली नाही. याबाबत आपण पोलिस अधिक्षकांकडे दाद मागणार असल्याचं गौरेश कामत यांनी स्पष्ट केलय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.