महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवास

0
142

नवी दिल्ली : दि. ०८ : महात्मा गांधींच्या ५६ वर्षीय पणतीला ६२ लाख रुपयांची फसवणूक आणि बनवाट कागदपत्रांच्या प्रकरणी डर्बन कोर्टाने सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आशिष लता रामगोबिन यांना सोमवारी कोर्टाने दोषी ठरवले. व्यापारी असल्याचे सांगून लता यांनी स्थानिक व्यावसायिकाची ६२ लाख रुपयांची फसवणूक केली. नफ्याचे आमिष दाखवून पैसे घेतले होते असे फसवणूक झालेल्या एसआर महाराज यांनी सांगितले. उद्योजक एसआर महाराज यांची फसवणूक केल्याचा आरोप लता यांच्यावर लावण्यात आला आहे. महाराजांनी लताला माल आयात करण्यासाठी व सीमाशुल्क भरण्यासाठी ६० लाख रुपये दिले होते. पण असा कोणताही माल महाराजा यांच्याकडे पोहोचवण्यात आला नाही. लता यांनी आश्वासन दिले होते की या नफ्यातील काही भाग ती एसआर महाराजांना देणार आहे.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.