वेंगुर्ला, वैभववाडी, सावंतवाड़ीत दूषित पाण्याचे प्रमाण वाढलं

0
246

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्याचे प्रमाण १९.२३ टक्के असून वेंगुर्ला, वैभववाडी आणि सावंतवाड़ी तालुक्यात दूषित पाण्याचे प्रमाण कमालीचे वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात अधिक तर शहरी भागात दूषित पाणी नसल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन स्पस्ट झाले आहे. यावर वेळीच उपाययोजना करण्याचे गरज आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्याची समस्या गंभीर बनत असून जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी सावंतवाडी, वेंगुर्ला, वैभववाडी आणि कुडाळ तालुक्यांमध्ये दूषित पाण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३९० पाणीनमुने तपासण्यासाठी घेण्यात आले होते. त्यापैकी ७५ पाणी नमूने दूषित आढळले आहेत .याचे प्रमाण सरासरी १९ . २३ टक्के एवढे आहे .तर शहरी भागातील तपासण्यात आलेल्या १०५ पाणी नामुन्या पैकी एकही पाणी नमुना दूषित आढळलेला नाही.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्याचे सरासरी प्रमाण १९.२३ टक्के एवढे असले तरी वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक ४०.४८ टक्के, वैभववाडी तालुक्यात २५ .०० टक्के, सावंतवाडी तालुक्यात २३.३३ टक्के तर कुडाळ तालुक्यात १९ .७८ टक्के दूषित पाणी असल्याचे माहे मे अखेर तपासणी केलेल्या पाणी नमुन्यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी पाण्याचे स्त्रोत दूषित होत असून हे स्त्रोत दूषित का होत आहेत यांचा शोध घेवून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ मे दरम्यान चक्रीवादळ आणि पावसाने हाहाकार उडविला . यात अनेक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना महामारी या साथी बरोबरच दूषित पाण्यामुळे अन्य साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत आरोग्य विभागाकडून सर्व्हे करून दूषित पाणी स्त्रोतांचे शुद्धीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
माहे मे अखेर तपासणी करण्यात आलेल्या ३९० पाणी नमुण्यांमध्ये वेंगुर्ला,वैभववाडी, सावंतवाडी,कुडाळ तालुक्यांमध्ये दूषित पाणी नमुन्यांची टक्केवारी जास्त दिसत आहे. ही चिंताजनक बाब आहे. त्यात आता झालेल्या चक्रीवादळ आणि पाऊस यामुळे आणखी पाणी स्त्रोत दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अधिक दक्षता घेवून पाणी स्त्रोतांचे सर्व्हेक्षण करून तात्काळ पाणी नमुने तपासणीसाठी पाठवावेत तसेच टी सी एल पावडर चा साठा उपलब्ध ठेवावा. अशा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी दिली.

तालुका निहाय दूषित पाण्याचे प्रमाण(टक्केवारी)

दोडामार्ग _०.००, सावंतवाडी-२३.३३, वेंगुर्ला-४०.४८, कुडाळ-१९.७८, मालवण-९.०९ कणकवली-५.६२, देवगड-०.००, वैभववाडी,२५.००

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.