पोलीस अधीक्षकांनी घेतला होडावडेतील कोरोना स्थितीचा आढावा

0
176

वेंगुर्ला : दि 10 : तालुक्यातील होडावडा येथे कोरोना रुग्ण संख्या जास्त असल्याने आज (दि. ०९ जून २०२१) पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी होडावडा येथील जास्त रुग्ण संख्या असलेल्या दळवीवाडी व कोरोना विलगिकरण कक्षाला भेट देऊन स्थानिक प्रशासनाला कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सूचना व मार्गदर्शन केले.
तालुक्यातील होडावडा गावात कोरोना रुग्ण संख्या असल्याने गावच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या वतीने या अगोदरच येथील बाजारपेठ ८ दिवस बंद ठेवण्यात आली आहे. तसेच येथील ग्रामपंचायत ग्राम कृती समिती व ग्रामस्थ यांच्या मदतीने याठिकाणी सुसज्ज असे कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे. दरम्यान या संपूर्ण परिस्थितीचा आज जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आढावा घेतला. तसेच येथील दळवीवाडी व कोरोना केअर सेंटरला त्यांनी भेट दिली. आणि यावेळी उपस्थित आरोग्य विभाग, ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाला मार्गदर्शन व आवश्यकत्या सूचनाही केल्या. यावेळी सरपंच अदिती नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, सर्कल श्री जाधव, ग्रा प सदस्य अनन्या धावडे, कृती समिती सदस्य राजबा सावंत, तलाठी श्रीमती मोरे, वैद्यकीय अधिकारी श्री जुन्नरे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद नाईक, रवींद्र केळुसकर, श्रीकृष्ण कोंडुस्कर, भाऊ दळवी यांच्यासाहित वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.