शिवसेनेतर्फे आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

0
145

वेंगुर्ला : दि 10 : महाराष्ट्र शासनाच्या खनिकर्म योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्र, आडेली साठी प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण शिवसेने तर्फे आडेली गावचे माजी सरपंच व शिवसेनेचे जेष्ठ नेते प्रकाश गडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी आडेली गावचे प्रभारी सरपंच संतोष कासले, दाभोली सरपंच उदय गोवेकर, आडेली माजी सरपंच भारत धर्णे, सोमेश्वर सेवा सहकारी सोसायटी आडेलीचे माजी चेअरमन चंद्रकांत गडेकर, गिरेश्वर सेवा सहकारी सोसायटी वजराठ चे चेअरमन बाबुराव परब, वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजीवनी पाटील, डॉ.वंदन वेंगुर्लेकर, आरोग्य सेवक शेखर कांबळी, आरोग्य सहाय्यक एस.व्ही सावंत, शिवसेना उपतालुका प्रमुख उमेश नाईक, पालकरवाडीचे माजी सरपंच बाबा वराडकर, आडेली ग्रामपंचायत सदस्य लिलाधर मांजरेकर, प्राजक्ता मुंड्ये, छाया गावडे तसेच वायगंणी ग्रामपंचायत सदस्य आनंद दाभोलकर, आडेली शिवसेना शाखाप्रमुख अशोक गावडे, अण्णा वजराठकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नितीन मांजरेकर, प्रशांत मुंड्ये, सचिन गडेकर, प्रविण गडेकर, सर्पमित्र दिपक दुतोंडकर, संदिप कांबळी, कुणाल बिडये, बाळा धुरी, शुभम गडेकर कार्यकर्ते उपस्थित होते.
या रुग्णवाहिकेची खूप वर्षांपासून ची मागणी मार्गी लागली व पंचक्रोशीतील रुग्णाना याचा फार मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याने आडेली पंचक्रोशीतील जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे. शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत ऊर्फ बाळू परब यांनी पालकमंत्री उदय सामंत व माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्याकडे आग्रही मागणी केल्यामुळेच ही रुग्णवाहिका आडेलीत प्राप्त झाली. तसेच आडेली गावातील चुकिची कामे करणा-याना सूज्ञ जनतेने नाकरल्याने त्यांनी फुकाचे श्रेय घेण्यासाठी नको ते खटाटोप करून जनतेची धूळफेक करू नये. राजकारण करायच्या ठीकाणी राजकारण करू. मात्र आता नागरिकांना आरोग्य सेवा देणे महत्त्वाचे असल्याने यासाठी अधिक प्रयत्न करू. असे नितीन मांजरेकर यांनी सांगितले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.