या कारणासाठी दिला शिरगाव कोरोना कृती सनियंत्रण समितीने राजीनामा

0
360

देवगड : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावात कोरोना गाव सनियंत्रित कृती समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून गावागावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र देवगड तालुक्यातील शिरगाव शेवरे ग्रामपंचायतीच्या कोरोना गाव सनियंत्रण कृती समितीने कोविड -19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार ,गुन्हे दाखल करूनही तहसीलदार ,गटविकास अधिकारी , व पोलिस निरीक्षक यांचे सहकार्य मिळत नसल्याने बुधवार 9 जून रोजी शिरगाव कोरोना गाव सनियंत्रण कृती समिती मधील अध्यक्ष समिर शिरगावकर,सदस्य वृदेश मेस्त्री,अलका धोपटे,मानसी जाधव,अमित साटम,मंगेश धोपटे,सहसदस्य रविंद्र जोगल, संदीप साटम,संतोष फाटक,राजेंद्र शेट्ये,दिनेश साटम,अनुराधा नाईक,सुगंधा साटम,स्नेहा मेस्त्री, आदी 14 लोकनियुक्त प्रतिनिधीनी आपला सामूहिक राजीनामा दिला आहे.तसेच गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाला कोणतेही सहकार्य करणार नाही. यापुढे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचे राजीनामा पत्र शिरगाव कोरोना गाव सनियंत्रण कृती समितीने जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.