कासार्डे धुमाळवाडी येथे ५५ कुटुंबाना धान्य वाटप; प्रकाश पारकर यांची सामाजिक बांधिलकी

0
113

कणकवली : कणकवली पंचायत समिती उपसभापती तथा सुप्रसिद्ध भजनसम्राट प्रकाश पारकर यांच्यावतीने कासार्डे धुमाळवाडी येथे 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबाना सामाजिक बांधीलकी या माध्यमातून धान्य वाटप करण्यात आले. या निमित्ताने उपसभापती प्रकाश पारकर यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण दिले आहे.

प्रकाश पारकर हे गेली अनेक वर्ष समाजाशी नाळ जुळवून घराघरात आपले कुटुंब या नात्याने गेली 40 ते 42 वर्ष छोट्या मोठ्या प्रत्येक प्रसंगाला आपला प्रसंग समजुन धाऊन जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून उपसभापती प्रकाश पारकर ओळखले जातात.त्यांच्या या कठीण काळातील उपक्रमाबद्दल गावातून व परिसरातून आभार मानण्यात आले .
उपसभापती प्रकाश पारकर यांच्या समवेत यावेळी राजु कदम,अभी धुमाळ, सहदेव म्हस्के, सौरभ पारकर, विवेक पारकर, गणेश केसरकर, महेश पवार, उदय पारकर, आशीष केसरकर, प्रशांत पारकर, सुरेश पवार, साईराज पारकर, प्रमोद पारकर, अतुल पारकर, शुभम पारकर व धुमाळ वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.