खुनासाठी वापरलेली ‘ते’ हत्यार पोलिसांच्या ताब्यात…!

0
1577

बांदा : दि. ११ : बांदा – गडगेवाडी येथील परप्रांतीय कामगार खुन प्रकरणी आज बांदा पोलिसांनी शहरातील आळवाडी तेरेखोल नदीपात्रातून खुनात वापरलेले टिकाव आज सकाळी जप्त केले. काल संशयित सुखदेव बारीक याने बांदा पोलिसांना गुंगारा देत दिवसभर खुनात वापरलेले साहित्य शोधण्यासाठी गोव्यात फिरविले होते. मात्र, पोलिसांच्या हाती काहीही लागले नव्हते.

आज सकाळीच पोलिसांनी खाक्या दाखविताच संशयिताने आपण खुनात वापरलेले टिकाव व रक्ताने माखलेले कपडे आळवाडी येथे तेरेखोल नदिपात्रात टाकल्याची कबुली दिली होती. त्यानुसार आज सकाळीच बांदा पोलिसांनी नदीपात्रात शोधमोहीम राबविली. पोलिस कर्मचारी विठोबा सावंत यांनी नदीपात्रात उडी घेत तब्बल अर्धा तास पाण्यात शोधाशोध केली. त्यावेळी नदीत मध्यभागी लोखंडी टिकाव सापडले. कपडे सापडून आले नाहीत. नदीला भरती असल्याने कपडे शोधण्यासाठी होडी मागविण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अनिल जाधव हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.