गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरण ; दोघांना जामीन मंजूर

0
132

सावंतवाडी | दि. ११ : बांदा ते सावंतवाडी रोडवर राज्य उत्पादन शुल्कच्यावतीने इन्सुली येथील नाक्यावर वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी २८ मे २०१९ ला गोवा बनावटीच्या दारू वाहतूक प्रकरणी गुजरात येथील दोघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी दोघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

इन्सुली येथे वाहनाची तपासणी करीत असताना महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीमध्ये रक्कम रुपये ५ लाख ५४ हजार ४०० किमतीची गोवा बनावटीची दारू व वाहन असे मिळून १५ लाख ८४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुजरात मध्ये राहणारे बनेसंग जोडसंग घेलडा आणि संदीप चंदूभाई हीरपरा यांना अटक करण्यात आली. या आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना १ जून २०२१ रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपीतर्फे जामीन अर्ज दाखल केला असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फे एडवोकेट परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.