जामसंडेत आढळला इसमाचा मृतदेह..!

0
1186

देवगड | प्रतिनिधी | दि. ११ : जामसंडे आझाद नगर येथील महेश जनार्दन शिर्के, वय ४० याचा मृतदेह जामसंडे गावठण येथील वडाजवळ आज दुपारी १२:३० च्या सुमारास आढळला.

मिळालेल्या माहितीनुसार जामसंडे आझादनगर येथील महेश जनार्दन शिर्के, वय ४० यांना दारूचे व्यसन होते . आज शुक्रवारी दुपारी १२:३० सुमारास जामसंडे गावठण येथील वडाजवळ मृतावस्थेत दिसले. तेथील ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात आणले असता रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ते मृत झाल्याचे जाहीर केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.