अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी हरिश्चंद्र पवार

0
144

सावंतवाडी : दि. ११ :  अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र पवार यांची निवड करण्यात आलीय. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष एस. एम. देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक यांनी नवीन प़सिध्दी प्रमुखांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. परिषदेने त्या त्या विभागातले उपाध्यक्ष, विभागीय सचिवांनी जिल्हाघ्यक्षांशी चर्चा करून नावांची शिफारस परिषदेकडे करायची होती. परिषदेकडे आलेल्या नावांबद्दल विचार करून योग्य निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोकणातील बहुतेक जिल्हयातील प्रसिध्दी प्रमुखांची नावे परिषदेकडे आली असून परिषदेने ही नावे निश्चित केली आहेत.

यामध्ये सिधुंदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी हरिश्‍चंद्र पवार, सावंतवाडी, रत्नागिरी जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी जमीर खलपे, रायगड जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी कमलेश ठाकूर पेण आणि पालघर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी विजय माणिक घरत यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे आणि सरचिटणीस संजीव जोशी यांनी या नियुक्तया आज जाहीर केल्या आहेत. सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या जिल्हयातील नवीन प्रसिध्दी प्रमुख पदाच्या या नियुक्तया एक वर्षांसाठी असतील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.