कणकवलीतलीही अत्यावश्यक सेवेतील दुकानंं शनिवार – रविवार राहणार सुरू

0
228

कणकवली | प्रतिनिधी | दि. ११ : कणकवली शहरातील अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने शनिवार – रविवार सायंकाळी ४ पर्यंत सुरु राहणार आहेत.

शनिवार – रविवार दोन दिवस दवाखाने, मेडिकल दुकाने वगळून अन्य सर्व दुकाने शनिवार रविवार बंद राहणार असल्याचे यापूर्वी कणकवली मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी सांगितले होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शनिवार व रविवार दोन दिवस अत्यावश्यक सेवेतील दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी दिली आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.