कृषी सेवा केंद्रांना तातडीनंं खत पुरवठा करणार ; खासदारांच रुपेश राऊळांंना आश्वासन

0
134

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. ११ :  खरीप हंगामा करीता शेतकऱ्यांना लागणारे खत लवकरात लवकर कृषी सेवा केंद्रांना पुरविण्यात येईल असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांना दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. संस्थेने संपूर्णा आणि समर्थ या मिश्र खताची मागणी झुआरी कंपनीकडे केली होती. परंतु या कंपनीकडून आवश्यक खताचा पुरवठा करण्यात आला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी खतांपासून वंचित होते. त्यामुळे सुरळीत खत पुरवठा करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी संस्थेचे व्हा. चेअरमन अरुण गावडे यांनी पत्रकाद्वारे खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली होती. यावेळी आज खासदार विनायक राऊत यांनी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांना हा खत पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.