सिंधुदुर्गला मिळणार 100 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ; सुरेश प्रभू यांनी आरोग्यमंत्र्यांकडं केली होती मागणी

0
309

सिंधुदुर्ग | दि. ११ : जिल्ह्यात ऑक्सिजन कमतरता मोठ्या प्रमाणात भासतेय. या परिस्थितीकडे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचं लक्ष वेधलं होत. आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहित सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि जंबो सिलेंडरची मागणी केली होती. याची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी लवकरात लवकर याची पूर्तता करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलय.

सिंधुदुर्गात कोरोनानंं हाहाकार माजवलाय. दिवसेंदिवस हा विळखा अधिकच घट्ट होताना दिसतोय. त्यातच बेड आणि ऑक्सिजनची कमतरता वेळोवेळी भासते. अशातच ऐन वेळी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना यासाठी धावपळ करावी लागते. जिल्ह्यातल्या या परिस्थितीकडे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचं लक्ष वेधलं होत. आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहित सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 100 ऑक्सिजन  कॉन्सन्ट्रेटर आणि जंबो सिलेंडरची मागणी केली होती. याची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी लवकरात लवकर याची पूर्तता करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलय.

केंद्राकडून ही मदत मिळाल्यास सिंधुदुर्गवासियांना दिलासाच मिळणार आहे. आता या आश्वासनाची नेमकी कधी पूर्तता होतेय, हे पहावं लागेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.