कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांना दिलासा ; SSPM हॉस्पिटलचा महत्वाचा निर्णय

0
447

कुडाळ | प्रतिनिधी | दि.१३ : एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल येथे कोव्हीड-१९ ग्रस्थ महिलांची विलीगीकरणयुक्त प्रसूतिगृहात प्रसूती करण्यात येणार. यासाठी लाईफटाईम हॉस्पिटल या ठिकाणी स्वतंत्र प्रसूतिगृह सुसज्य करण्यात आले आहे.

कोव्हीड-१९ च्या या काळात गर्भवती महिलांना मोठ्याप्रमाणात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गर्भवती माता कोव्हीड-१९ प्रभावित झाली तर तिच्या आरोग्याला मोठया प्रमाणात धोका निर्माण होतो. अश्या अनेक घटना समोर येत
असताना एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल व्यवस्थापन आणि प्रशासनाने अगदी तातडीने पावले उचलून
विलीगीकरणयुक्त प्रसूतिगृहात प्रसूती करण्यास सुरुवात केली आहे. हे नवीन विलीगीकरणयुक्त प्रसूतिगृह हे मात्र कोव्हीड-१९ ग्रस्थ महिलांची प्रसूती करण्यासाठी वापरले जाणार असून यामुळे कोव्हीड- १९ प्रभावित नसलेल्या गर्भवती महिलांना याचा कोणताही प्रादुर्भाव होणार नाही याची संपूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे.

एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल, सिंधुदुर्ग वासियांना दर्जेदार आणि विश्वसनीय आरोग्य सेवा आणि सुविधा देण्यास तत्पर असून उच्चगुणवत्ता धारक अनुभवी डॉक्टर आपली सेवा बजावत आहेत.

रुग्णालय संदर्भीय इतर सर्व माहितीसाठी रुग्णालय रिसेप्शन क्रमांक
०२३६७-२३४००० / ८२०८३२८११८ / ८२०८३८९२२६ /

९५१८३४१९४२ / ९५१८३०६२२३

सौ. दुर्वा गंगावणे
९३७००५६०७६

अनिल कुडपकर

९४२०९०७६६१.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.