गोपाळ कुबल यांचे अल्पशा आजाराने निधन

0
564

कुडाळ : बिबवणे-पळसेवाडी येथील रहिवासी व प्रतिष्ठित ग्रामस्थ गोपाळ (बबन) लक्ष्मण कुबल यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर कुडाळ येथे उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, एक विवाहीत मुलगी, जावई, दोन भाऊ, भावजया, बहिण, भावोजी, पुतणे, पुतण्या, चुलत भाऊ, भावजय, काकी असा मोठा परिवार आहे.
रेल्वे कर्मचारी अमित कुबल यांचे ते वडील तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश कुबल व शिक्षक मधुकर कुबल, रेल्वे कर्मचारी संतोष (परशुराम) यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.