आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धा डॉक्टर्स, नर्स यांचा सत्कार

0
407

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्याचे  पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री, युवासेनाप्रमुख आदित्यजी  ठाकरे यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.  पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तसेच नर्स यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, जि. प. गटनेते नागेंद्र परब, हरी खोबरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, गीतेश कडू, डॉ.शाम पाटील, डॉ.गोडबोले, डॉ. रेड्डीज डॉ. शिवचरण आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.