पेंढरी ग्रामपंचायत सदस्या नम्रता घाडी यांचा शिवसेनेत प्रवेश

0
564

देवगड : देवगड तालुक्यातील पेंढरी ग्रामपंचायत सदस्या सौ नम्रता अंकुश घाडी यांचेसह अन्य पाच जणांनी सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सतीश गुरव, राजेश गुरव, शांताराम गुरव अंकुश घाडी यांनी पेंढरी येथे वह्या वाटप कार्यक्रमावेळी हा प्रवेश केला असून या सर्वांना नियुक्तीपत्र देऊन शिवसेनेत स्वागत करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, शैलेश भोगले, सरपंच सौ राधिका गुरव , देवगड तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.