कोविड सेंटरमधून पळाला ; केला आत्महत्येचा प्रयत्न

0
2799

देवगड | प्रतिनिधी | दि. 19 

देवगड कोविड सेंटरमधून पळून जावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न जामसंडे येथील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने केला होता. या घटनेने देवगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामसंडे येथील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला गुरुवार 17 जून रोजी सायंकाळी 5 वाजता कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले. हा रुग्ण दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कोविड सेंटर मधून घरी पळून गेला. ही बाब घरातील लोकांनी नगरपंचायतला कळविल्यानंतर नगरपंचायत कर्मचारी त्याला आणण्यासाठी गेले असता त्या रुग्णाने घराच्या मागील दाराने पळ काढत जवळच्या विहिरीत उडी टाकण्याचा प्रयत्न करत होता. त्याला घरातील एका व्यक्तीने त्याला अडविले.

दरम्यान त्या कोरोना रुग्णाने घरात धाव घेऊन कोणतेतरी विषारी द्रव्य प्राशन केले. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. माहिती मिळताच देवगड पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्या व्यक्तीवर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.