कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांना पितृशोक..!

0
393

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. 24

बांधकाम विभाग कुडाळचे उपअभियंता तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागच्या कार्यकारी अभियंता  अनामिका जाधव यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. हरेश सिताराम चव्‍हाण, वय ७५ वर्ष असे त्यांचे नाव असून, काल दिनांक २३ जून २०२१ रोजी रात्री हृदय विकाराचा झटका आल्याने माजगाव येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर आज दिनांक २४ जून २०२१ रोजी सावंतवाडी येथील उपरलकर स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात आले आहेत.

जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग ओरोसचे सेवा निवृत्त प्रबंधक सागरिका चव्हाण यांचे ते पती होत. त्यांचे पश्चात मुलगा, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार असून, त्यांचा मुलगा भारत पेट्रोलियम या कंपनीमध्ये उच्च पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तसेच त्यांची मुलगी मुंबई येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये लघु लेखक म्हणून कार्यरत आहे. कै. हरेश चव्हाण यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या निधनाची दुःखद बातमी समजतात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.