शिक्षक संघटनेचं आंदोलन…!

0
330

सिंधुदुर्गनगरी : दि. ३० :  कोविड महामारीच्या काळात माध्यमिक शाळांचे वेतन बिल न स्वीकारण्याच्या माध्यमिक विभागाच्या धोरणा विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भरती (माध्यमिक) संघटनेच्यावतीने आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना २५ जून २०२१ आदोलनाची नोटिस देऊन कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत लक्ष वेधले होते. तसेच जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांची वेतन बीले स्वीकारून वेळेत पगार होण्याच्या दृष्टीने उचित कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र, माध्यमिक शिक्षण विभागाकडून याबाबत कोणतीच उचित कार्यवाही अथवा दखल घेतली गेली नाही. या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्यावतीने आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

या धरणे आंदोलनात कोरोनाचे सर्व नियम पाळून शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर, राज्य प्रतिनिधी चंद्रकांत चव्हाण, गिरीश गोसावी, दिगंबर सारंग, आनंद राठ्ये हे सहभागी झाले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.