सेनेच्यावतीने कळसुली प्राथ. आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर

0
370

कणकवली | प्रतिनिधी | दि. 03

उदयोग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मागणी नुसार आज कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व संदेश पारकर यांच्या हस्ते ऑक्सिजन कॉन्संट्रेटर सुपूर्द करण्यात आले.

यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे नेते संदेश पारकर, उपजिल्हा प्रमुख राजू राणे, आरोग्य अधिकारी संजय पोळ,डॉ बागडे, कणकवली तालुका प्रमुख शैलेश भोगले , विभाग प्रमुख रुपेश आंमडोसकर, कळसुली सरपंच साक्षी परब, राजू राठोड, भास्कर राणे,सहदेव बाळा नाईक,माजी सरपंच अतुल दळवी,सुशांत दळवी,भाई सावंत,चंदू परब,नरेश दळवी ,सुनील हरमलकर, ललित घाडीगांवकर, कैलास घाडीगांवकर, व कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महाराष्ट्र सरकार च्या वतीने 1लाख पी पी ई किट देण्यात आले असल्याचे सांगत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात 2000 किट्स देण्यात येणार असल्याचे सांगत पुढील काळातही सरकार च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वेळोवेळी मदत करण्यात येईल असे सांगितले.  तसेच जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी देखील उदयोग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून 5 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर दिल्या बदल त्यांचे आभार मानत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आरोग्य यंत्रणा खूप चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे म्हणत सरकारच्या माध्यमातून आपण कडून त्यांना वेळोवेळी मदत करण्यात येईल असे सांगितले.

सिंधुुदुर्ग जिल्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी गावागावात तातडीने उपचार व्हावेत यासाठी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन कॉन्संट्रेटर असावे. यासाठी कळसुली प्राथमिक आरोग्या केंद्रात उधोग मंत्री सुभाष देसाई यांच्यावतीने जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मागणी नुसार शिवसेनेच्यामाध्यमातून आज कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचे वितरण करण्यात आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.