‘बांदा – संकेश्वर’ चा बाप दाखवला | महामार्ग सावंतवाडीतूनच | शिवराम दळवींना पत्र |

0
759

सावंतवाडी : दि. ०४ :  महाराष्ट्र व कर्नाटकला जोडणाऱ्या नव्या रेडी संकेश्वर मार्गाऐवजी केंद्राने संकेश्वर-बांदा मागार्ला मंजुरी दिलीय. त्याबाबतचा अद्यादेश ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून काढण्यात आला होता. हा रस्ता बावळट मार्गे बांद्याला जोडणार अस पसरवले जात होत. माजी आमदार शिवराम दळवी यांनी सिंधुदुर्ग लाईव्हचा माध्यमातून बांदा- संकेश्वरचा बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला असं आव्हान दिल होत. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा रस्ता सकेंश्वर-बांदा असा असून तो सावंतवाडीतूनच जाणार यावर शिक्कामोर्तब केले आहे. तसे पत्रही या विभागानं माजी आमदार शिवराम दळवी यांना दिलय. याबाबतची माहिती माजी आमदार शिवराम दळवी यांनी दिलीय. त्यामुळे आता अफवांना ब्रेक लागलाय‌. महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या नव्या महामागार्ची संकल्पना केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली होती. त्यानंतर रेडीपासून संकेश्वरपर्यंतच्या रस्त्याचे सर्व्हेक्षणही करण्यात आले होते. मात्र नव्या सर्व्हेक्षणात हा रस्ता संकेश्वरवरून रेडीला जोडण्याऐवजी बांद्याला जोडण्याचे निश्चित करण्यात आले होते. १०३ किलोमीटरचा हा असणार आहे. हा रस्ता कर्नाटकातून संकेश्वरवरून येथून सुरू होणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज-आजारा तर सिंधुदुर्ग जिल्हयातील आंबोली-माडखोल-सावंतवाडी-इन्सुलीवरून महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या बांद्याला जोडला जाणार आहे. सावंतवाडीतून नेमका कुठून हा महामार्ग जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. हा महामार्ग एनएच ४८ म्हणून ही निश्चित करण्यात आला आहे. तो बांदा येथे एनएच ६६ ला जोडला जाणार आहे. याबाबत उपविभागीय राष्ट्रीय महामागार्चे उपअभियंता पी.जी.बारटक्के यांनी अधिकृतपणे सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिवराम दळवी यांना माहीती दिल्याने आता या रस्त्याच्या अधिकृत मार्गावर शिक्कामोर्तब झाला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.