सावंतवाडीत जुगार अड्ड्यावर छापा

0
716

सावंतवाडी : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्र डोंगर येथे तीन पत्ती जुगार खेळतात, अशी माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी विशेष पथकासह अड्ड्यावर टाकला छापा टाकत चौघांना ताब्यात घेण्यात आल. पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची अवैध धंद्यावरील कारवाई सुरु असतानाच गुरुवारी सावंतवाडी नरेंद्र डोंगर येथे तीन पत्ती जुगार सुरु असल्याची माहिती सावंतवाडी पोलसांना मिळाली. याच पार्श्वभूमीवर पोलिसाच्या विशेष पथकान या अड्ड्यावर छापा टाकला आणि  स्विफ्ट कार,२ अॅक्टीव्हा मोटार सायकल,६ मोबीईल, ३ सोलर पॉवर सिस्टीमच्या बॅटऱ्या, चटया,चादरी, तसेच ३२ हजार ५०० रोख रक्कम असा एकूण ५ लाख ७५ हजार ४५० रु.मुद्देमाल जप्त केला तर  हेमंत शामराव रंकाळे (वय -२८), नेल्सन जॉकीलुईस फर्नाडीस (वय-४२), पवर विलास बिद्रे (वय-२४), महेश ज्ञानेश्वर बांदेकर (वय ३०) या  चौघांना  ताब्यात घेत याच्या विरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाणे येथे मुंबई जुगार कायद्यानुसार कलम (१२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात  आलाय.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.