ब्रेकवाॅॅटरसाठी रापण मासेमारीच्या भागात टाकलेले दगड हटवा..!

0
305

वेंगुर्ला | प्रतिनिधी | दि. 08 

मांडवीखाडी मुखाच्या ठिकाणी आधुनिक बंधारा (ब्रेक वाँटर) बांधकामासाठी तयार करण्यात आलेले सिमेंट काँक्रीटचे त्रिशंकू आकाराचे दगड हे नवाबाग किनाऱ्यावरील भागात अस्ताव्यस्त टाकले गेल्याने पारंपारीक रापण मच्छिमारी व बिगर यांत्रिक मच्छीमारी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्या भागात मच्छीमारी केल्यास मच्छीमारांचे फार मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सदरची त्रिशंकु दगड तातडीने हटविण्याची मागणी पारंपारिक रापण संघाच्या मच्छीमार आणि पारंपारिक बिगर यांत्रिक मच्छिमारांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, मालवणचे सहाय्यक मत्स्यआयुक्त यासह खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर व स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.

पावसाळी हंगामात १ ते ३१ जुलै हा कालावधी मासेमारीसाठी बंदीचा काळ म्हणून शासनाने घोषित केलेला आहे. मात्र किनाऱ्यावरून केल्या जाणाऱ्या पारंपारिक मासेमारीला त्यात मुभा देण्यात आलेली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात वादळी वारे व तुफान सदृश्य परिस्थिती सोडून इतर कालावधीत पारंपारिक रापण संघ किनाऱ्यावरून आपल्या रापण जाळ्याद्वारे तसेच बिगर यांत्रिक होड्या किनार्‍यालगत मासेमारी करतात. त्यावर या सर्वसामान्य मच्छीमारांची रोजीरोटी चालते. या दरवर्षीच्या पारंपारिक मासेमारी वर त्या भागात ब्रेक वॉटर बांधण्यासाठी तयार करण्यात आलेले सिमेंट काँक्रीटचे त्रिकोणी दगड हे टाकण्यात आल्याने मासेमारीसाठी अडचण निर्माण झालेली आहे. या अडचणीमुळे मच्छीमारांची तसेच बिगर यांत्रिक होड्यांची जाळी फाटून नुकसान होण्याबरोबरच त्यांच्या होड्यां त्या दगडावर आपटून होणाऱ्या अपघातात होड्यांचे नुकसान तसेच जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. दररोजचे जीवन चरितार्थासाठी पारंपारिक मासेमारी रापणसंघ व बिगर यांत्रिक नौका मासेमारी करण्यासाठी अत्यावश्यक असून सध्या किनाऱ्यावरून वेंगुर्ले बंदर जेटीपर्यंत जे ब्रेकवॉटरचे काम मेरीटाईम बोर्ड व मत्स्य विभाग यांचेमार्फत चालू करण्यात आलेले असून ब्रेकवॉटरसाठी लागणारे त्रिशंकू आकाराचे सिमेंट काँक्रीटचे बनविलेले दगड ज्या भागात मासेमारीसाठी जाळी लावली जातात. त्या भागात टाकले गेल्याने रापण मच्छिमारी यांत्रिक होड्यांच्या मच्छीमारी अडथळा निर्माण झालेला आहे. यामुळे हे दगड तातडीने काढून किनार्‍यावर आणून ठेवावेत व पारंपारिक रापण मच्छिमारी व पारंपारिक होड्यांना मासेमारी करण्यास ती जागा खुली करावी. अशी मागणी उभादांडा नवाबाग किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या ४ रापण संघांच्या मच्छीमार सदस्यांनी तसेच बिगर यांत्रिक होड्यांनी मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांतर्फे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, मालवणचे सहाय्यक मत्स्य आयुक्त, वेंगुर्लेचे मत्स्य परवाना अधिकारी, वेंगुर्ले तहसीलदार, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर तसेच स्थानिक प्रशासन यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

वेंगुर्ले बंदर समुद्रकिनाऱ्या कडून मांडवी खाडीत गेलेला जलमार्गाच्या ठिकाणी खाडीचे मुख वर्षानुवर्षे गाळाने भरत असल्यामुळे व्यवसाय करणे तसेच अन्य साधनाने समुद्रात मासेमारी करण्याकरिता खाडीतून समुद्रात लोकांना ये-जा करणे फारच अडचणीचे व धोकादायक बनलेले आहे. यासाठी मांडवीखाडी मुखाशी साचणाऱ्या गाळाला प्रतिबंध करणारा अत्याधुनिक बंधारा ब्रेक वॉटर व्हावा अशी गेल्या कित्येक वर्षांची मागणी होती. त्यास अनुसरून २०१९-२० रोजी हा बंधारा मंजूर झालेला आहे. बंधाऱ्यासाठीचे सामान जोडणीचा एक भाग म्हणून सदर काम घेतलेल्या ठेकेदाराने जागेवर सिमेंटचे त्रिशंकू आकाराचे वजनदार टनाच्या वजनाचे दगड तयार करून समुद्रालगत ज्या जागेवरून राखण्याची मासेमारी केली जाते त्याच जागी अस्ताव्यस्त टाकलेले आहेत त्यामुळे आपण व्यवसाय पूर्णतः अडथळा निर्माण होऊन रापणीची मासेमारी करणे अशक्यप्राय, जीवघेणी, धोकादायक आणि जोखमीची झालेली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.