श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’चा ट्रेलर रिलीज

0
754

मुंबई : नुकताच राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर अभिनित आगामी ‘स्त्री’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून जवळपास तीन मिनिटांचा हा ट्रेलर जितका हसवणारा आहे तितकाच थरकाप उडवणारा आहे. पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका यामध्ये आहेत. ३१ ऑगस्ट रोजी अमर कौशिक दिग्दर्शित हा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्त्री’ या नावाचे भूत असल्याच्या दंतकथा एका गावात असतात. पंकज त्रिपाठी हीच कथा राजकुमार आणि त्याच्या मित्रांना ऐकवत असतो. दगावात रवर्षी होणाऱ्या पूजेच्या वेळी चार दिवसांसाठी ‘स्त्री’ नावाचे भूत गावात येते आणि पुरुषांना ठार मारते. दरम्यान एक सुंदर स्त्री एका टेलर तरुणाला भेटते. ती त्या गावात राहात नाही पण ती फक्त वर्षातून एकदाच पुजेच्या वेळी येत असते. तो तिच्या प्रेमात पडतो…आणि सुरू होतो एक थरार. ‘स्त्री’ चित्रपटाच्या माध्यमातून श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव ही जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आणि आता हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.