कणकवली | प्रतिनिधी | दि. 12
कणकवली ते आचरा मार्गावर वरवडे येथे सोमवारी दुपारनंतर संंततधार पडणाऱ्या पावसाचे पाणी घेऊन रस्ता बंद झालाय. वरवडे सेंट उर्सुला स्कूलच्या दरम्यान पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय. कणकवली तालुक्यात खारेपाटण गावातही पाणी आल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच अजूनही कणकवली तालुक्यातील काही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते बंद झालेत.