पालकमंत्री 14 जुलैला जिल्हा दौऱ्यावर..!

0
591

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी | दि. 12 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे बुधवारी 14 जुलै 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

बुधवार 14 जुलै रोजी सकाळी 10.45 वा. मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे शिवसंपर्क अभियान शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती

सकाळी 11 वा. मातोश्री मंगल कार्यालय येथे संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर तसेच शिवसेना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित कोरोना योद्धा सत्कार कार्यक्रमास उपस्थिती

दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना, कडक निर्बंध व लसीकरण संदर्भात आढावा बैठक

दुपारी 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद

दुपारी 3.30 वा. तहसिलदार कार्यालय, दोडामार्ग येथे प्रादेशिक अधिकारी, एम.आय.डी.सी. रत्नागिरी – सिंधुदुर्ग. कार्यकारी अभियंता, उपअभियंता, एम.आय.डी.सी. यांच्या उपस्थितीत आडाळी एम.आय.डी.सी. आढावा बैठक

दुपारी 4.30 वा. मंदार हॉल, सासोली, ता. दोडामार्ग येथे शिवसंपर्क अभियान कार्यक्रमास उपस्थिती

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.