केंद्रीय मंत्री नारायण राणे इन्व्हेस्टमेंट अँड ग्रोथ कमिटीवर

0
977

नवी दिल्ली | दि. 13 

केंद्रीय मंत्रिमंडळात फेर बदल करण्यात आल्यानंतर आता कॅबिनेट कमिट्यांमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. कॅबिनेट कमिट्यांमध्ये नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. नारायण राणेंपासून ते मनसुख मंडवियांपर्यंत अनेक मंत्र्यांना कॅबिनेट कमिट्यांवर घेण्यात आले आहे.

इन्व्हेन्सटमेंट अँड ग्रोथ कमिटीमध्ये नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया, अश्विनी वैष्णव यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असते. तर रोजगार आणि स्किलशी संबंधित कमिटीमध्ये धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, हरदीप पुरी, आरसीपी सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. या कमिटीचे अध्यक्षपदही पंतप्रधानांकडे आहे.

स्मृती ईराणी, अनुराग ठाकूर यांचा समावेश

पार्लिमेंट्री अफेयर्सच्या कॅबिनेट कमिटीत अर्जुन मुंडा, विरेंद्र कुमार, किरण रिजिजू, अनुराग ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे. या कमिटीचे अध्यक्षपद संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे आहे. तर पॉलिटिकल अफेयर्सशी संबंधित कमिटीत स्मृती ईराणी, सर्वानंद सोनोवाल, गिरीराज सिंह, मनसुख मंडविया, भूपेंद्र यांचा समावेस करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समितीचे अध्यक्ष आहेत.

मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर फेरबदल

मंत्रिमंडळाचा विस्तार करताना 12 केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांनीही राजीनामे दिले होते. त्यामुळे अनेक समित्यातील पदे रिक्त झाली होती. त्यामध्ये नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.