टेनिस स्टार रॉजर फेडररची टोकियो ऑलिम्पिकमधून माघार

0
64

क्रीडा वृत्त : येत्या २३ जुलैपासून ८ ऑगस्टपर्यंत टोकियो येथे ऑलिंपिक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मात्र, या मोठ्या स्पर्धेतून स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने माघार घेतली आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. टोकियो ऑलिंपिकसाठी फेडररचा स्वित्झर्लंडच्या खेळाडूंच्या पथकात समावेश होता. मात्र, दुखापतीमुळे त्याने माघार घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. फेडररने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली की ‘ग्रास कोर्टच्या हंगामादरम्यान मला दुर्दैवाने गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास झाला. त्यामुळे मला टोकियो ऑलिंपिकमधून माघार घेण्याचा निर्णय स्विकारावा लागला आहे. माझी खूप निराशा झाली आहे, कारण जेव्हाही मी स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे, तेव्हा माझ्यासाठी प्रत्येकवेळी तो सन्मान होता आणि माझ्या कारकिर्दीतील महत्त्वाचा भाग होता.’ फेडररने पुढे म्हटले की ‘मी पूर्वपदावर येण्यासाठी तयारी सुरु केली आहे. आशा आहे की येत्या उन्हाळ्याच्या अखेरीस मी पुनरागमन करेल. मी संपूर्ण स्विस संघाला शुभेच्छा देतो आणि मी त्यांना दुरून पाठिंबा देत राहिल. नेहमीप्रमाणे, हॉप स्विस!’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.