T-Seriesचे मालक भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

0
264

बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. टी-सीरिज कंपनीचे सर्वेसर्वा भूषण कुमार  यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. टी-मालिका प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका 30 वर्षीय मुलीवर भुषण कुमार यांनी अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने लावला आहे. याप्रकरणी मुंबईतील डीएन नगर पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत असल्याचे कळतेय.
माहितीनूसार, मुंबईतील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना घडली असून 2017 ते 2020 पर्यंत भूषण कुमार बलात्कार करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच पीडित तरुणीला तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात असल्याचे तिने सांगितले आहे. मात्र या संपुर्ण घटनेबाबत भूषण कुमार किंवा त्यांच्या टिमने अद्याप कोणत्याही प्रकारचे वक्तव्य तसेच स्पष्टीकरण दिलं नाहिये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.