खचलेल्या मोरीच्या दुरुस्तीचे नगराध्यक्षांचे आदेश | सिंधुदुर्ग LIVE न वेधलं होतंं लक्ष

0
624

कणकवली | प्रतिनिधी | दि. 17

कणकवली प्रांत कार्यालय ते कॉलेज रोड कडे जाणाऱ्या मोरीवरील रस्त्या खचला होता. त्यामुळे इथून प्रवास करण जीवघेण ठरत होत. सिंधुदुर्ग LIVE काल याबाबत लक्ष वेधलं होत. त्यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सिंधुदुर्ग LIVE च्या बातमीची दखल घेत खचलेल्या मोरीच्या दुरुस्तीचे तातडीने आदेश दिले.

शुक्रवारी सायंकाळी हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला. आज या मोरीच्या दुरुस्तीचे करण्याचे काम हाती घेतले आहे. मागील काही दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे कणकवली प्रांत कार्यालया मागील असलेल्या नाल्यामधून कणकवली शहरातील निम्म्या भागाचे पाणी जात असते कणकवली शहरात पावसाचे प्रमाणही मोठे असल्याने कॉलेज रोड जाणाऱ्या मोरीवरील रस्त्याला मोठे भगदाड पडून रस्ताच खचल्याने संपूर्ण मोरी व रस्ता वाहून जाण्याची भीती व्यक्त होत होती. त्यानंतर नगराध्यक्षांनी तातडीने दखल घेतल्यान नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.