पोर्नोग्राफी | राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता

0
958

मुंबई | दि. २१

उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला सोमवारी रात्री 19 जुलै 2021 अश्लील चित्रपट निर्मिती आणि त्याचे काही अॅप्सवरून प्रकाशित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.

मुंबई पोलीस आयुक्तांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘फेब्रुवारी 2021 मध्ये गुन्हे शाखा मुंबईने अश्लील चित्रपट तयार करणे आणि काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रकाशित करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आम्ही राज कुंद्रा यांना 19 जुलै रोजी अटक केली आहे. कारण ते यामागचे प्रमुख व्यक्ती असल्याचं समोर येत आहे. आमच्याकडे यासंदर्भात पुरेसे पुरावे आहेत. चौकशी सुरू आहे.’

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा हा प्रदीप बक्षीचा नातेवाईक असून तो यूकेमध्ये राहतो. त्याच्याकडे केनरीन प्रॉडक्शन हाऊस नावाची युके आधारित कंपनी आहे. प्रदीप बक्षी हे त्यांचे नातेवाईक आणि या कंपनीचे अध्यक्ष याशिवाय राज कुंद्राचा व्यवसाय भागीदार आहेत.

कुंद्रा आणि बक्षी यांच्यातील स्फोटक व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून पैशांची देवाण-घेवाण कशी झाली आणि अश्लील कंटेटद्वारे अँडवान्स रक्कम कशी मिळवली गेली. हे दोघांच्या संभाषणात समोर आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरचं ग्रुप चॅट पोलिसांच्या हाती लागलं आहे.

राज कुंद्रा यांचे माजी पीए उमेश कामत यांनी भारतात केनरीन प्रॉडक्शन हाऊसचे प्रतिनिधी म्हणून काम केले होते आणि ही कंपनी पॉर्न फिल्मसाठी कित्येक एजंटांना कंत्राट देत होती आणि त्यासाठी अर्थसहाय्य करते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.