कुडाळ ‘रोटरी’ च्या अध्यक्षपदी अभिषेक माने

0
471

कुडाळ | प्रतिनिधी | दि. 21 

सन 2021-22 या वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या अध्यक्षपदी अभिषेक माने यांची निवड करण्यात आली असून सेक्रेटरी पदी अमित वळंजू व खजिनदारपदी दिनेश आजगावकर यांची निवड करण्यात आली असून वार्षिक पदग्रहण सोहळा व्हर्चुअल ने रविवार दिनांक 25जुलै रोजी सायंकाळी 6.30वा महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर चे माजी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी ह्रषिकेश केसकर व असिस्टंट गव्हर्नर शशिकांत चव्हाण उपस्थित राहणार आहेत असे रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

संपूर्ण जगभरात पोलिओ निर्मुलनसाठीचे भरीव निधी व योगदान रोटरी इंटरनॅशनल ने दिलेले असून जगामध्ये जेव्हा जेव्हा महामारीची संकटे आली त्या त्या वेळी रोटरी इंटरनॅशनल क्लब ने योगदान दिलेले आहे. कोरोना कोव्हीड 19 या महामारीवर सुध्दा लवकरच मात करून हे संकटही दूर करण्यासाठी रोटरी क्लब प्रयत्नशील आहे. दरवर्षी 1जुलैपासून रोटरी क्लब चे नवीन वर्ष सुरू होत असून प्रतिवर्षी नूतन कार्यकारिणी ची निवड करण्यात येते.

या वर्षीची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष – अभिषेक माने , सेक्रेटरी अमित वळंजू, खजिनदार दिनेश आजगावकर, आयपीपी सचिन मदने, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी प्रमोद भोगटे, उपाध्यक्ष राजन बोभाटे, सार्जंट अॅट आर्मस रविंद्र परब, क्लब सर्व्हिस नीता गोवेकर, व्होकेशनल सर्व्हीस डॉ राजवर्धन देसाई, कम्युनिटी सर्व्हिस राकेश म्हाडदळकर, इंटरनॅशनल सर्व्हीस एकनाथ पिंगुळकर , युथ सर्व्हीस राजीव पवार, पोलिओ प्लस डॉ संजय केसरे, क्लब ट्रेनर शशिकांत चव्हाण, क्लब मेंबरशीप प्रणय तेली, क्लब अॅडमिनीस्ट्रेशन काशिनाथ सामंत, पब्लिक रिलेशन अॅड राजीव बिले, द रोटरी फाऊंडेशन गजानन कांदळगावकर, सर्व्हिस प्रोजेक्ट मकरंद नाईक, हिस्टाॅरियन डॉ रविंद्र जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

नूतन अध्यक्ष अभिषेक माने यांनी वर्षभरात कोव्हीड 19 च्या आपत्कालिन परिस्थितीत आॅनलाईन प्राजेक्टस व सोशल डिस्टंसिंगचे पालन करत विविध शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावर्षी रोटरी इंटरनॅशनल ची थीम सर्व टू चेंज लाईव्हज अशी असून रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम, महिला सक्षमीकरण, स्वरक्षणासाठी प्रशिक्षण वर्ग, गरजू महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी शिबिर, डायलेसिस मशीन्स उपलब्ध करणे, आरोग्य तपासणी व मधुमेह तपासणी शिबिर, होम नर्सिंग ट्रेनिंग कोर्सेस, बालह्रदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर, राहत मेडिकल मिशन अंतर्गत आरोग्य शिबिर, स्माईल उपक्रमांतर्गत ओठावरील शस्त्रक्रिया शिबिर, एक चमच कम चार कदम आगे मधुमेह जनजागृती मोहीम, रक्तपेढी व रक्तदान शिबीर, टू व्हिलर मेडिकल सर्व्हिस, इच वन गेट वन अंतर्गत मेंबरशीप वाढविण्यासाठी प्रयत्न, पर्यावरण जनजागृती मोहीम अंतर्गत 200 फळझाडे लागवड असे विविध उपक्रम यशस्वी करण्याचा मानस नूतन अध्यक्ष अभिषेक माने यांनी व्यक्त केला आहे.

25जुलै रोजी होणार्‍या व्हर्चुअल वार्षिक पदग्रहण सोहळ्यात गेली 28 वर्षे रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने विविध राबविलेले उपक्रम व रोटरी इंटरनॅशनल क्लब ची माहिती व विविध प्रोजेक्टबाबतची माहितीचा समावेश असलेली” सिंधुरत्न “रोटरी ई बुलेटीन प्रकाशित होणार आहे.सन 2021-22 वर्षासाठी डिस्ट्रिक्ट 3170 मध्ये क्लबच्या ज्या सदस्यांची डिस्ट्रिक्ट आॅफिसर म्हणून निवड झाली आहे त्यांचे सत्कार, व्यवसायामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या एका व्यक्तिची होकेशनल अॅवार्ड दिपक कुडाळकर यांना तर कोव्हिड संकटकाळात विशेष उल्लेखनिय कामगिरी करणारे मिशन आधार ग्रुप कुडाळ, सर्पमित्र डॉ सुधिर राणे यांचे विशेष सत्कार करण्यात येणार आहेत. गतवर्षात रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने दोन नवे क्लब स्थापन केले हे क्लब स्थापन करणा-या प्रणय तेली व गजानन कांदळगावकर तसेच मावळते अध्यक्ष सचिन मदने यांचे विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष अभिषेक माने यांनी स्पष्ट केले.

या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सर्वांना झूम या अॅपची लिंक कार्यक्रमापूर्वी दोन दिवस अगोदर पाठवली जाणार असून या लिंकवर क्लिक करून सर्वांनी सुरक्षित घरी राहून आॅनलाईन सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.