किंजवडेकरांच्या आरोपांना विलास साळसकरांच उत्तर

0
743

देवगड | प्रतिनिधी | दि. 21

शिवसेना शिवसंपर्क अभियान ही संकल्पना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे. यांनी आदेश दिल्यानंतर सर्वत्र ही योजना राबविण्यात येत आहे.देवगड तालुक्यातील शिवसेना संपर्क अभियानाचा शुभारंभ जामसंडे येथील सांस्कृतिक भवन सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. देवगड तालुका भाजपचा बालेकिल्ला असून या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान घेतल्याने संतोष किंजवडेकर यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.कोरोनाचे सर्व नियम पाळून आम्ही अभियानाचा शुभारंभ केला. त्यामुळे किंजवडेकर त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही. शिवसेना एखादा संकल्पकतेने कार्यक्रम घेतो तेव्हा त्या कार्यक्रमाला कोणाची परवानगी लागत नाही आणि परवानगीची वाट देखील शिवसैनिक पाहत नसल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी शिवसेना पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

साळसकर पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर आरोप करत आहात तुम्हाला जिल्ह्याच्या पालकत्वाचे नातेच कळलेले नाही. आम्हाला परवानगी घ्यायला सांगता मग फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांनी जी गावागावात आंदोलने केली या आंदोलनाला होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव वाढणार हे त्यांना कळलं नाही का ? त्यांना परवानगी दिली कोणी विरोधक आहात म्हणून तुम्हाला परवानगी आणि आम्ही सत्ताधारी असूनही तुम्ही आम्हाला परवानगी विचारता तुम्हाला ज्यांनी परवानगी दिली. त्यांनीच आम्हाला परवानगी दिली असल्याचा टोला शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यावेळी लगावला.

पालकमंत्री म्हणून तुम्ही निष्क्रिय ठरलात असे म्हणता मग तुम्हीही किंजवडे गावचे प्रथम नागरिक आहात मग किंजवडे गावात कोरोना प्रसार कसा वाढला व त्याचे बिंग फुटले त्यानंतरचं गावातील नागरिक कोविड सेंटरला येऊ लागले. पार्सल पालकमंत्री अशी भाषा तुम्ही करता ही भाषा तुमच्या मुखातून योग्य नाही कारण तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात.

नगरपंचायत, पंचायतसमिती मध्ये असलेले घोटाळे स्वतः करायचे आणि त्याची चौकशी देखील आपण स्वतः करायला लावायची असले काम शिवसैनिक करत नाही.देवगड पंचायत समितीमधील झालेल्या शिक्षण घोटाळ्याची चौकशी कोणामार्फत करावी हेच त्यांना माहीत नाही. शिक्षण घोटाळ्यात असलेल्या व्यक्तींना व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करा यांची मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी केल्यानंतरच विरोधकांना जाग आली. घोटाळा करणारे पण तुम्हीच आणि तो उघड करणारे देखील तुम्हीच हेच या तालुक्याचे दुर्दैव असल्याचे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी केले सांगितले यावेळी उपतालुकाप्रमुख निवृत्ती तथा तारी शहरप्रमुख संतोष तारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.