विनायक केरकर कुटुंबियांना दीपक केसरकर यांच्याकडून तातडीची मदत

0
462

वेंगुर्ला | प्रतिनिधी | दि. 21

 
परूळे शिवसेना शाखाप्रमुख विनायक केरकर यांचे कोरोना मुळे निधन झालं. त्यांच्या कुटुंबियांना आमदार दीपक केसरकर यांनी तातडीची मदत म्हणुन १० हजार रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश म्हापण जि प विभाग शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केरकर यांच्या पत्नी शिल्पा केरकर यांच्याकडे देण्यात आला.

केरकर कुटुंबियांना पालकमंत्री उदय सामंत व आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, परुळे ग्रा प सदस्य विजय घोलेकर, परूळे उपसरपंच मनिषा नेवाळकर, विभाग प्रमुख योगेश तेली, केळुस माजी सरपंच योगेश शेटये, चिपी सरपंच गणेश तारी, युवासेनेचे रोहीत म्हापणकर, पपू पेडणेकर, उपस्थित होते. तर यावेळी संजय गांधी निराधार योजनेचा कुटंबाला लाभ मिळवून देणार व आकस्मित मृत्यू झाला त्याचे २० हजार मीळवून देणार असल्याचे शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आले. तसेच केरकर यांच्या दोन लहान मुलांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.