संजू परब ठरले देवदूत | अडीच वर्षांचा चिमुकलीचा वाचवला जीव

0
498

बांदा : सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी अनेकवेळा माणुसकी जपत आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे. आजही बांद्यातील अडीच वर्षीय मुलीसाठी संजू परब देवदूतच ठरले आहेत. ग्रा.पं. सदस्य जावेद खतीब यांनी केलेली मागणी अवघ्या काही तासात संजू परब यांनी पूर्ण करत पुन्हा एकदा माणुसकीच उदाहरण दाखवून दिल. बांदा येथील अडीच वर्षीय मुलीला गंभीर आजार झाला आहे.तिला पुढील उपचारासाठी मुंबई येथील बड्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे.मात्र त्यासाठी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटरची आवश्यकता होती.बांदा येथे असलेला कॉन्स्ट्रेंटर मोठा असल्याने गाडीत अडचण निर्माण होणार होती.त्यामुळे त्या बालिकेच्या पालकांनी बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांच्याकडे मदत मागितली.

दरम्यान जावेद खतीब यांनी तात्काळ सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्याशी संपर्क साधला. संजू परब यांनी क्षणाचाही विलंब न लावता ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर तात्काळ बांद्यात पाठवून दिला.त्यामुळे त्या बालिकेला पुढे उपचारासाठी नेण्याचा मार्ग सुकर झाला.संजू परब यांनी दाखवलेल्या या माणुसकी आणि सामाजिक बांधीलकीचे कौतुक होत असून त्या बालिकेच्या पालकांनी संजू परब यांचे आभार मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.