BSNL चा उडाला पुरता फज्जा | राष्ट्रवादीची कार्यालयाला धडक

0
386

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. 23

मुसळधार पावसामुळे बीएसएनएलचा नेटवर्कचा पुरता फज्जा उडाला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बीएस एन एलचा कार्यालयाला भेट देत विचारपूस केली. यावेळी बीएस एन एलचे उप महाप्रबंधक श्री. देशमुख यांनी रत्नागिरी, कोल्हापूर आदी भागात पावसामुळे काम करण्यास अडथळे निर्माण होत असल्यानं नेटवर्करला प्रॉब्लेम आहे. जिल्ह्यात कोणतीही अडचण नसून उद्या पर्यंत नेटवर्क पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती दिली. यावेळी उद्योग व व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, संतोष जोईल आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.