गांजा प्रकरण | बॉबी बेग पोलीसात हजर

0
271

सिंधुदुर्ग : दि. २५ : आकेरी घाटी येथे गांजा प्रकरणी फरार असलेला मुख्य संशयित फैजल उर्फ बॉबी बेग हि आज सायंकाळी उशिरा स्वताहून हजर झाला असल्याची माहिती या प्रकरणाचे तपास अधिकिरी पोलीस उपनिरिक्षक सागर शिंदे यांनी दिली. तर या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले अतुल उमेश गवस (२३ रा. खासकिलवाडा सावंतवाडी ), मयुरेश कांढरकर (१८) व आशिष कुलकर्णी यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. यामुळे गांजा प्रकरणात मोठे रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थानिक गुन्हा अनवेष्ण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक ए. ए. देसाई यांना मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दि. २३ रोजी संध्याकाळी आकेरी वेंगुर्ला रस्त्यावर सापळा रचून संशयित मयुरेश गुरुनाथ कांडरकर व आशिष अशोक कुलकर्णी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३६७ ग्रॅम सुमारे ११हजार रुपयांचा गांजा त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला होता. यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक सागर शिंदे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला होता.

यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत शिंदे यांनी संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री नंतर पोलीस निरिक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे व त्यांचे सहकारी स्वप्निल तांबे व रुपेश सारंग यांच्या पथकाने सावंतवाडी येथे धाड टाकली. मध्यरात्री ३ वा. कांडरकर याला गांजा देणारा अतुल गवस याला ताब्यात घेतले व त्याला सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेले.

सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने अधिक माहीती घेतल्यावर यातील मुख्य सुत्रधार फैजल उर्फ बाॅबी बेग रा माठेवाडा मालदारमार्ग हा असल्याचे समोर आले. यानुसार बाँबी बेग याच्या घरावर छापा टाकला. मात्र बॉबी बेग हा संशयीत आरोपी फरार झाला. मात्र, बेग याच्या जुनाट घरातून बाथरूमच्या माडीवर ठेवलेला ३ किलो २७८ ग्रँम वजनाचा सुमारे ९८ हजार ४०० रुपये किंमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला.

यातील चौथा व मुख्य सुत्रधार असलेला फरारी संशयीत आरोपी फैजला उर्फ बॉबी बेग हा आज कुडाळ पोलीसात स्वत:हून हजर झाला. त्याला आता अटक करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पसरलेल्या गांजा विक्री प्रकरणाच्या जाळ्याचा पर्दापाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा संशयित हा मोठ्या नगरपालिकेतील नगरसेवकाचा नातेवाईक आहे. त्यामुळे ताब्यात आलेला संशयित तपास कामात किती सहकार्य करतो हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या संशयिताला बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न होणार हे नक्की. संशयित हा कायद्या शाखेचा विद्यार्थी असल्याचे समजते. संशयित बेग व पहिला संशयित यापूर्वी कधीही समोरा समोर आले नाहीत. तीसरा संशयित अतुल गवस याच्या मार्फत हि देवाण घेवाण चालत होती. हा संशयित आर्थिक अपेक्षा न करता केवळ एका झुरक्यासाठी हि रिसॉर्ट उचलत होता असे समजते. आता बेग ताब्यात आल्याने तपासाला निश्र्चितच गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.