इनरव्हील क्लबच्या नुतन कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

0
157

वेंगुर्ला | प्रतिनिधी | दि. 26 

इनरव्हील क्लब, वेंगुर्लेने सामाजिक जाणीवेतून महिलांसाठी चांगल्या स्वरुपाचे समाज उपयोगी कार्यक्रम राबवून महिलांना सेवा देण्याचे काम करावे. कोरोनाचा काळ लक्षात घेऊन नियम पाळून कार्यक्रम घ्यावेत. असे प्रतिपादन इनरव्हीलच्या शपथ प्रदान अधिकारी विद्या करंदीकर यांनी पदग्रहण सोहळ्यांत केले.

येथील साईमंगल कार्यालयात इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लेच्या २०२१-२२ या नुतन कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा प्रमुख पाहुण्या तथा शपथ पदान अधिकारी विद्या करंदीकर हस्ते व प्रमुख अथिती उमा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अध्यक्ष ज्योती देसाई, उपाध्यक्ष अफशान कौरी, सचिव स्मिता दामले, खजिनदार समिक्षा वालावलकर, आय.एस.ओ. वृंदा गवंडळकर, एडीटर पूजा कर्पे यांना त्या त्या पदाची शपथ देण्यांत आली.

यावेळी व्यासपिठावर मावळत्या अध्यक्षा गौरी मराठे यांच्यासह इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्या, रोटरीचे अध्यक्ष सदाशिव भेंडवडे, सचिव सुरेंद्र चव्हाण, प्रा. वसंतराव पाटोळे, प्रा.आनंद बांदेकर, सई चव्हाण, अक्षया गिरप आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या नुतन सदस्या आरती गिरप, श्रीया परब यांना सदस्यपदाची शपथ दिली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोरोना योध्दा म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत, नगरपरिषदेच्या प्रशासकिय अधिकारी संगिता कुबल, आरोग्य सेविका विनीता तांडेल, डॉ.पुजा कर्पे, डॉ.अफशान कौरी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वेंगुर्ला नगरपरीषदेच्या स्वच्छता कर्मचा-यांना व्हिटॅमीन सी व बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्यांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ.पुजा कर्पे यांनी तर आभार स्मिता दामले यांनी मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.