कणकवली न. पं. चे कारभारी भ्रष्ट : संदेश पारकर

0
543

कणकवली | प्रतिनिधी | दि. 27 

कणकवली नगरपंचायतीचे कारभारी हे भ्रष्टाचारी असून नगरपंचायतही भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. अशा या कारभार्‍यांना आगामी निवडणुकीच घराचा रस्ता दाखविण्याचा निर्धार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील शिवसैनिकांनी करावा. तसेच सत्तेचा गैरवापर करून कारभार्‍यांनी केलेल्या गैरव्यवहारांची माहिती शिवसैनिकांनी जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळकेवाडी येथील गुरव यांच्या निवासस्थानी शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी पारकर बोलत होते. यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर,शहर प्रमुख शेखर राणे,सुजित जाधव,प्रतीक्षा साटम,मीनल म्हसकर,नगरसेविका मानसी मुंज,तेजस राणे,भिवा परब,प्रसाद अंधारी,योगेश मुंज,अमित मयेकर,दिव्या साळगावकर आदी आदी उपस्थित होते.

पारकर म्हणाले, नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद व दहशतीचा वापर केल्यामुळे सेनेचे 7 ते 8 उमेदवार काही मतांच्या फरकाने पराभूत झाले. या निवडणुकीत सेनेचा पराभव झाला म्हणून आम्ही शहराच्या विकासाची जबाबदारी शिवसेनेने सोडली नाही. शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी खासदार, आमदार फंडातून आणला. तसेच कोरोनाच्या काळात शिवसैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावून कोरोनाग्रस्तांना मदत केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील असून शिवसैनिकांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच सेनेचा भगवा फडकवण्यासाठी आतापासून कामाला लागावे आणि सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या कामांची माहिती जनतेपर्यंच जावून सांगावी, असे आवाहन करताना सिंधुदुर्गासाठी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर त्याकरिता 966 कोटींचा निधी दिल्याबद्दल पारकरांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

अतुल रावराणे म्हणाले, 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करणारा शिवसेना पक्ष आहे. जेव्हा जेव्हा राज्यावर नैसर्गिक संकटे येतात त्यावेळी सर्वप्रथम जनतेच्या मदतीला बाळासाहेबांचा शिवसैनिक धावून जातो. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा आरोग्य यंत्रणा कमकुवत होती. ती सक्षम करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांनी पुढाकार घेऊन ती सक्षम केली आहे. कोकणाला शिवसेनेने भरभरून दिले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सेनेचे सर्वाधिक उमेदवार निवडणूक आणण्यासाठी शिवसैनिकांनी आत्तापासून कामाला लागावे आणि जिल्ह्यात भगवे वादळ निर्माण करूया, असे आवाहन त्यांनी केले.

सुशांत नाईक म्हणाले, कणकवलीच्या विकासासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत,आम.दीपक केसरकर,आम.वैभव नाईक यांनी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. न. पं.चे सत्ताधार्‍यांकडून गलथान कारभार सुरू असून निवडणुकीत दिलेल्या घोषणांची पूतर्ता त्यांच्याकडून होत नाही आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांबद्दल जनतेच्या मनात तीव्र नाराजी असून या नाराजीचा फायदा शिवसैनिकांनी उठवून शहरात सेनेचे नेटवर्क स्टॉग केले पाहिजे. तसेच सत्ताधार्‍यांनी केलेले भ्रष्ट्राचार पुरव्यानिशी सेनेचे नगरसेवक जनतेसमोर उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नीलम सावंत पालव यांनी पक्ष संघटना कशाप्रकारे वाढवावी याबाबत शिवसैनिकांनी मार्गदर्शन केले. यावेळी भैरीभवानी संस्थेतर्फे व संदेश पारकर यांच्यातर्फे उपस्थितांना काजू कलम, छत्री, वह्यांचे वाटप करण्यात आले. या शिवसंपर्क अभियानाला शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.