कृणालच्या संपर्कात आलेले ‘हे’ ८ खेळाडू दुसऱ्या टी२०ला मुकण्याची शक्यता

0
74

कोलंबो: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. या मालिकेतील दुसरा टी -२० सामना मंगळवारी (२७ जुलै ) खेळला जाणार होता. परंतु, सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे हा सामना एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. परंतु, आता भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी पुन्हा समोर आली आहे. मंगळवारी (२७ जुलै) दुसरा टी२० सामना सुरू होण्यापूर्वी कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बीसीसीआयच्या एका सूत्राने मंगळवारी सांगितले होते की, त्याच्या संपर्कात आलेल्या ८ भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणीही निगेटीव्ह आली आहे. हे खेळाडू दुसऱ्या टी -२० सामन्यासाठी उपलब्ध असतील. परंतु, ईएसपीएन क्रीकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या संपर्कात आलेले ८ खेळाडू श्रीलंकेविरुद्ध बुधवारी (२८ जुलै) मैदानावर उतरू शकणार नाही. त्यांना सध्या पुढील काही निर्णय घेईपर्यंत आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे. दुसरा टी -२० सामना बुधवारी (२८ जुलै) आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.